नाशिक : शोभायात्रा, आदिवासी नृत्याने वेधले लक्ष

sinner www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ सिन्नर व सहयोगी आदिवासी संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मंगळवारी (दि. 9) सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शोभायात्रा, आदिवासी लोकनृत्य, आदिवासी गीत व प्रबोधन सभेचे आयोजन आदी कार्यक्रम पार पडले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कोताडे, बिरसा ब्रिगेड मातृशक्ती प्रमुख संगीता पिंपळे, माजी सभापती सुमन बर्डे, माजी नगरसेवक अशोकराव मोरे, रूपेश मुठे, माजी जिल्हा परिषद सदस्या सखूबाई वाजे, शीला गवारी,
माजी नगरसेविका लता हिले, राजलक्ष्मी खेताडे, अलका पवार, परशुराम मोरे, सागर खेताडे, सागर पवार आदी उपस्थित होते.
प्रत्येक आदिवासी गाव, वाडी, वस्तीवर आदिवासी क्रांतिकारकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी बांधवांचे रॅलीद्वारे सिन्नर शहरात आगमन झाले. हुतात्मा स्मारक येथे आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन केल्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आडवा फाटा, बसस्थानक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील कार्यालयामार्गे हुतात्मा चौक येथे पोहचली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आदिवासी लोकनृत्य, आदिवासी गीत व प्रबोधन सभा आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. राजपथ दिल्ली येथे तीन वेळा महाराष्ट्र राज्याच्यातीने लोकसंस्कृती रॅलीत प्रतिनिधित्व करणारे आदिवासी नृत्य कलापथक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. आदिवासी लेजीम पथक दापूर, पावरी पथकबोरखिंड तसेच आदिवासी गायकविक्रम कवटे, एकनाथ बगाड, कविता भांगरे, कविता मडके, आरती पवार यांनी आदिवासी क्रांतिवीरांचे शौर्यगीत गायन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
माजी आमदार वाजे, तहसीलदार कोताडे, सुमन बर्डे आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा स्मारक येथे युवा नेते उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिरसा ब्रिगेडचे शरद लहांगे, एकलव्य संघटनेचे किरण मोरे, आदिवासी युवा फाउंडेशनचे विठ्ठल खोकले, संदीप गवारी, गणेश गुंबाडे, शरद डगळे, बहिरू जाधव, भरत मोरे, लखन कुंदे, विलास जाधव आदींसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

भागोजी नाईक यांचे संविधान स्तंभावर नाव कोरावे : खेताडे
आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळाचे देवराम खेताडे यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्याचे आज अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सिन्नरचे भूमिपुत्र क्रांतिवीर भागोजी नाईक यांचे संविधान स्तंभावर नाव कोरण्यात यावे, ही आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : शोभायात्रा, आदिवासी नृत्याने वेधले लक्ष appeared first on पुढारी.