नाशिक : संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी हेच शाळेचे वैभव

सरदवाडी शाळा www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शाळेचा विद्यार्थी सर्वोत्कृष्ट व्हावा या धडपडीतून घडणारे संस्कारक्षम आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी हेच शाळेचे वैभव असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी होते. व्यासपीठावर शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर, भगवान कर्पे, नगरसेविका ज्योती वामने आदी उपस्थित होते. आपल्याला संस्कारांचे बीजारोपण करून आदर्श नागरिक बनवणार्‍या शाळेप्रती असणारे ऋणानुबंध असेच जपा असे प्रतिपादन अध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी केले. विद्यालयाचे यावर्षी तब्बल 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. रिद्धी बनकर, ओमकार मांडे व अथर्व क्षत्रिय या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जेजुरकर, योगेश वैष्णव, शंकर बेनके, रोहिणी भाटजिरे, अमोल निकुंभ, सुवर्णा आव्हाड तसेच संस्थेच्या सर सी. व्ही. रमण अकादमीचे मार्गदर्शन लाभले. स्वमेशा गवळी हिने विद्यार्थी मनोगत, भारत मांडे व सुदाम मुखेकर यांनी पालक मनोगत व योगेश वैष्णव यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका जेजूरकर यांनी प्रास्ताविक केले. किरण लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रीती पवार, अनिता चव्हाण, रोहिणी भाटजिरे, सुवर्णा आव्हाड, नेहा गितेकर, रुपाली चोपडे, संजय आरोटे, आशा डहाके, गायत्री देशपांडे, जयंत मोरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5वी) : हर्षल भाबड -232/298 (23 वा), विराज मुखेकर -218/298 (54 वा), अथर्व बुरकूल – 206/298 (101 वा), हर्षवर्धन खिंडकर -206/298 (104 वा), भूषण बिन्नर -198/298 (146 वा), हर्षल पवार संदीप – 198/298 (153 वा), हार्दिक आरोटे-190/298 (199 वा) स्वरा सोनवणे – 188/298 (217 वी), इंद्रजित बिन्नर- 186/298 (236 वा), गायत्री गोजरे – 178/298(310 वी), तेजस राजगुरू – 178/298(317 वा). पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-(8 वी) स्वमेशा गवळी -210/298 (35 वी), कादंबरी रोहोम -204/298 (50 वी), श्रावणी शिरसाट-170/298(205 वी), साक्षी बुरकूल -166/298(244 वी), जान्हवी बोडके-166/298(236 वी), ओमकार मांडे-166/298 (242 वा).

हेही वाचा:

The post नाशिक : संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी हेच शाळेचे वैभव appeared first on पुढारी.