नाशिक : समर्थ सेवामार्गाचे कुशावर्त स्वच्छता अभियान

स्वच्छता अभियान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत सक्रिय आरोग्यदूत अभियानाच्या वतीने कुशावर्त स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचारांचा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या सव्वाशे महिला पुरुष सेवेकर्‍यांनी यात सहभाग नोंदवला.

गुरुपीठाच्या वतीने चंद्रकांतदादा मोरे यांनी सहभागी झालेल्या सेवेकर्‍यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी 8 वाजता पंचवटीत करण्यात आला. कुशावर्त, त्रिसंधेश्वर मंदिर, गायत्री मंदिर या परिसरात एक ट्रॅक्टरपेक्षा ज्यादा कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. उपक्रमाबाबत बोलताना चंद्रकांतदादा मोरे म्हणाले, महिन्याच्या दुसर्‍या रविवारी नियमितपणे सेवेकरी या परिसराची स्वच्छता करणार आहेत. वस्त्रदान आणि मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार अभियान राबविवार आहोत. खर्‍या अर्थाने गुरुपौर्णिमेपासून या कामास सुरुवात झाली. त्या दिवशी शेकडो सेवेकर्‍यांनी गोदामाता उगमस्थळी त्र्यंबकमध्ये हे अभियान राबवले आहे, असे त्यांनी सांगितले. यनिमित्त 525 गरजूंना वस्त्रवाटप करण्यात आले, तर 275 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : समर्थ सेवामार्गाचे कुशावर्त स्वच्छता अभियान appeared first on पुढारी.