नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी

रेशीमगाठी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीला वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे तिचे प्राण वाचले. एवढेच नव्हे तर तरुणीचे अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्नदेखील झाल्याने रेशीमगाठींमुळे तिच्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू झाली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार या तरुणीला डॉ. कांबळे देवमाणूस भेटला, असेच म्हणावे लागेल.

बुधवारी (दि. १९) वैशाली गायकवाड (21, रा. वीरगाव) ही विठेवाडी, ता. देवळा (जिल्हा नाशिक) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत निकम यांच्याकडे मजूर म्हणून कामाला आली होती. तिला बुधवारी विषारी सर्प चावल्याने येथील डॉ. संजय निकम यांच्याकडे नातेवाइकांनी उपचारासाठी दाखल केले होते. या रुग्णाच्या डोळ्यावर झापड व चक्कर येत होती. यासंदर्भात डॉ. निकम यांनी देवळा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांच्याशी संपर्क साधून रुग्णाला देवळा ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवले. डॉ. कांबळे यांनी तिला विषारी सर्पदंशाचे सर्व लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले. बेशुद्ध अवस्थेत पोहोचलेल्या वैशालीला रक्ताची बॅग व मास्क आणि ऑक्सिजन लावून कृत्रिम श्वसन चालू केले. त्यानंतर रुग्णाची श्वसनयंत्रणा चालू झाली व बीपी आणि नाडी ठीक झाली.

त्यानंतर वैशालीला स्वतः डॉ. कांबळे यांनी मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी दाखल केले. तेथे आणखी योग्य उपचारांमुळे ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. डॉ. गणेश कांबळे यांनी वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे वैशालीचे प्राण बचावले.

हेही वाचा : 

The post नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी appeared first on पुढारी.