Site icon

नाशिक : सातपूरला झाड कोसळून पत्र्याचे घर भुईसपाट

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथील महादेववाडीमध्ये गुरुवार (दि.1) रात्री 11च्या दरम्यान वादळी पावसाने गुलमोहराचे झाड कोसळल्याने पत्र्याचे घर पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी सातपूर विभागीय अधिकारी यांना निवेदन देत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

जिभाऊ धिवरे, विजया धिवरे यांनी दि. २४ जूनला सातपूर विभागीय कार्यालयात धोकादायक गुलमोहराचे झाड छाटण्यासाठी अर्ज केला होता. सामाजिक कार्यकर्ते विजय अहिरे यांनीदेखील मनपाचे उद्यान विभागाचे लोखंडे यांना निवेदन दिले होते. परंतु, मनपा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अखेर गुरुवार (दि.1) दुर्घटना घडलीच. घरातील गुहीणी ऊजा धिवरे यांच्या तत्परतेमुळे त्यांच्या मुलाचे प्राण वाचले. परिसरातील काही भिंतींना तडे गेले व मोठ्या प्रमाणात घरातील नुकसान झाले. अनेकांच्या घरातही पाणी शिरले. सातपूर शिवसेना विभागप्रमुख योगेश गांगुर्डे व उपविभागप्रमुख सुनील मौले यांनी सातपूर विभागीय अधिकारी बैरागी व सातपूरचे तलाठी शेटे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यावेळी जिभाऊ धिवरे, विजया धिवरे, नाना सोनवणे, सचिन घाटोळ, बाळा पवार उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूरला झाड कोसळून पत्र्याचे घर भुईसपाट appeared first on पुढारी.

Exit mobile version