नाशिक : सातपूर शिवजन्मोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सातपूर शिवजन्मोत्सव,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

‘तुमचं आमचं नात, काय जय जिजाऊ जय शिवराय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, असा जयघोष करीत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अध्यक्ष सचिन गांगुर्डे, कार्याध्यक्ष डॉ. वृषाली सोनवणे, उपाध्यक्ष रोहिणी देवरे, दीपक वाघचौरे, सचिव धीरज शेळके, हेमंत घुगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिनकर पाटील म्हणाले की, सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा सहावा शिवजन्मोत्सव साजरा होत असून, यामध्ये सातपूर व नाशिकमधील सर्व पक्षीय पदाधिकारी, शिवप्रेमी व सर्व क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी होतात. यातून सातपूरमधील सामाजिक ऐक्य दिसून येते. सचिन गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाबाबत माहिती दिली. डॉ.वृषाली सोनवणे यांनी आभार मानले. सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना सर्व नियमांचे व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, इंदूबाई नागरे, माधुरी बोलकर, तसेच समितीचे नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, देवा जाधव, दीपक लोंढे, संदीप पवार,ॲड. महेंद्र शिंदे, रवींद्र देवरे, विजय अहिरे, योगेश गांगुर्डे आदींसह सर्व सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सातपूर शिवजन्मोत्सव संपर्क कार्यालयाचे उद्घाटन appeared first on पुढारी.