नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको…(व्हिडीओ)

सायखेडा पूल,www.pudhari.news

नाशिक (निफाड): पुढारी ऑनलाइन

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरीच्या काठी वसलेलं सायखेडा हे एक सुंदर गाव आहे.  कांदा मार्केट आणि लगतच्या गावांची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून सायखेड्याची ओळख तर आहेच शिवाय पौराणिक वारसा देखील सायखेड्याला प्राप्त आहे. परंतु गावात प्रवेश करण्यासाठी नाशिक ते औरंगाबाद महामार्गावरून सायखेड्याला पोचण्यासाठी पार करावा लागतो तो एक खूप जूना व धोकादायक पूल…

हा पूल पार करण्याची बाप्पाला देखील भीती वाटते. बाप्पा देखील हा धोकादायक पूलावरुन यायला तयार नाही. त्यामुळे यंदा आमच्याकडे बाप्पा होडीतून आले. अन् याचवेळी लांबूनच हा धोकादायक पूल पाहताना उंदीर मामाला व सर्व सायखेडकरांना पडलेला प्रश्न म्हणजे “नक्की कधी बांधला जाणार नवीन पूल”? या संकल्पनेचा व आशयाचा देखावा साकारलाय सायखेडा येथील ॲड. दिपा अनिल सारडा यांनी.  त्या दरवर्षी गणपतीसाठी नवनवीन देखावे करत असतात.

गोदाकाठ भागातील दळवणाच्या दृष्टिकोनातून हा पूल महत्वपूर्ण आहे. ऑगस्ट महिन्यातच येथील नदीवरील पानवेली काढल्यात आल्या आहेत. मात्र,  सायखेडा ते पिंपळगाव तसेच आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा पूल धोकादायक बनला आहे. येथील पुलाला कठडे राहिलेले नाही. त्यामुळे येथील पुलाला समांतर नवीन पुलाची गरज निर्माण झाली आहे. हीच मागणी त्यांनी या देखाव्यातून शासन दरबारी मांडली आहे.

येथील धोकादायक पुलावरुन आम्ही रोज प्रवास करतो. मात्र बाप्पा कसे येणार असा प्रश्न पडला? एक नवीन संकल्पना डोक्यात आली. बाप्पा म्हणताय की या धोकादायक पुलावरुन मी प्रवास करणार नाही. मग, बाप्पा होडीतून येतील असा आशय व संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. या देखाव्यात सायखेडा येथील धोकादायक पूल दाखवला आहे. शासनाला बुद्धी देवो आणि आमच्या पूलाचे काम मंजूर होवो असे साकडे बाप्पाला घातले आहे.
– ॲड. दिपा अनिल सारडा, सायखेडा

हेही वाचा :

The post नाशिक : सायखेड्याला बाप्पा आले होडीतून; म्हणाले, पुलावरुन अजिबात नको...(व्हिडीओ) appeared first on पुढारी.