नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक

cidco khadde www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे वाढलेले साथीचे आजार, तर दुसरीकडे रस्त्यांतील खड्ड्यांमुळे होणारे अपघात या समस्यांवरून सिडकोतील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांची भेट घेतली आहे. मनपाने सिडको भागात तातडीने धूर व औषधफवारणी करावी तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आदी मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून नाशिक शहरात सतत पडणाऱ्या पावसामुळे सिडको भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आहेत. यामुळे एकीकडे वाहनधारकांना अडथळा, तर दुसरीकडे डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचेही प्रमाण वाढले आहे. या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाकडून ताबडतोब निर्जंतुकीकरण, औषधाची फवारणी होणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यांमधील खड्डयांमध्ये साचलेल्या डबक्यांमुळे दुचाकीस्वाराला खड्ड्यांचा अंदाज येत नसून छोटे-मोठे अपघात होत आहेत. मनपाकडून मुरूम व कच टाकून खड्डे बुजविले जातात, परंतु ही कच व मुरूम रस्त्यावर पसरल्यामुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून डांबर, खडी वापरून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे सिडको मंडल-१ चे अध्यक्ष शिवाजी बरके, माजी नगरसेविका छाया देवांग, सरचिटणीस रवींद्र पाटील, डी. बी. राजपूत, महिला मोर्चा मंडल अध्यक्ष अर्चना दिंडोरकर, उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे, ॲड. अजिंक्य गिते, उत्तम काळे, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजेंद्र जडे, दिव्यांग आघाडी उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे, महिला मोर्चा सरचिटणीस जान्हवी बिरारी, जयश्री धारणकर, युवती मोर्चा शहराध्यक्ष साक्षी दिंडोरकर, विश्वनाथ इप्पर आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडकोतील खड्ड्यांवरून भाजप आक्रमक appeared first on पुढारी.