नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेच, परंतु स्वामी विवेकानंदनगर, मोरवाडी अमरधामसह काही भागांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी पाणी जमा झाले होते. मोरवाडी येथील अमरधाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने ते थेट अमरधामलगत असलेल्या नागरिकांच्या घरासमोर जाऊन साचले. मोरवाडी अमरधामची संरक्षण भिंत पोकळ झाल्याने त्यातून पाण्याचा बाहेर निचरा होत आहे व परिसरातील नागरिकांच्या घरात आणि घरासमोर पाणी साचत आहे. स्वामी विवेकानंद नगर, तसेच गणेशचौक, एन. ए. सेक्टर, उपेंद्रनगर परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मनपाच्या दुर्लक्षामुळे पावसाचे पाणी घरात शिरल्याचा आरोप काँग्रेसचे मुन्ना ठाकर यांनी केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडकोत घरात शिरले पावसाचे पाणी appeared first on पुढारी.