नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने ‘मनसे’चा जल्लोष

सिडको मनसे जल्लोष,www.pudhari.news

सिडको / नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाला होत असलेला विरोध लक्षात घेता माजी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे मनसेने स्वागत केले आहे. या प्रकरणी मनसेने सातत्याने दिलेल्या लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्त केली आहे.

मायको सर्कलपाठोपाठ त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलांची गरज नसल्याच्या आयआयटी पवईच्या अहवालानंतर तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशानंतर मनसेने त्रिमूर्ती चौकात पेढे वाटप करून आनंद साजरा केला आहे. दरम्यान, संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांनी तीव— विरोध दर्शविला होता. त्यास नागरिकांच्या बाजूने मनसे उभी राहत उड्डाणपूल त्वरित रद्द केला जावा, अशी भूमिका घेतली. यावेळी मनपा आयुक्तांसह पालकमंत्र्यांनाही मनसेतर्फे निवेदने देण्यात आली.

नाशिककरांच्या कराच्या पैशातून तब्बल 250 कोटींची उधळपट्टी करून गरज नसताना पूल उभारणीच्या हट्टाविरोधात मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल केली होती. त्या अनुषंगाने आलेल्या आयआयटी पवईच्या अहवालानंतर उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मनसेच्या लढ्याला यश आल्याने, पदाधिकार्‍यांकडून पेढे वाटून आनंद साजरा केला. याप्रसंगी दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी, बबन जगताप, महिला सेनेच्या कामिनी दोंदे, अरुणा पाटील, निर्मला पवार, भाग्यश्री ओझा, गौतम पराडे, सचिन कामानकर, सचिन रोजेकर, राहुल पाटील, मनोज जैन, अजिंक्य शिर्के, पंकज दातीर, गोपी पगार, गोपी गांगुर्डे, शुभम थोरात, सचिन ओझा, समाधान चव्हाण, गणेश दातीर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने 'मनसे'चा जल्लोष appeared first on पुढारी.