नाशिक/सिडको : घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी जाळली

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी जळीत प्रकरण सुरुच आहे. चुंचाळे परिसरातील मारुती संकुल दत्तनगर परिसरात घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी जाळून टाकली.

चुंचाळे परिसरातील मारुती संकुल दत्तनगर परिसरात नाठे यांनी घरासमोर अॅक्टीव्हा पार्क केली होती. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकानी पेट्रोल टाकून ती जाळली. दुचाकीने पेट घेतल्यानंतर आवाज झाल्याने नाठे घरातून बाहेर आले. त्याचवेळी आजुबाजुचे नागरिकही जमा झाले.  नागरिकांनी दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही.

अॅक्टीवा शेजारी असलेली अन्य दुचाकी वाहने वाचली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक/सिडको : घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी जाळली appeared first on पुढारी.