Site icon

नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
शासनाने नाशिक सिडको कार्यालयासाठी औरंगाबाद येथील सिडको कार्यालयातील विपणन अधिकारी राजय कुरे यांची सिडको कार्यालयासाठी प्रशासकपदी नियुक्ती केली. कुरे यांनी सोमवारी कार्यालयात कारभार स्वीकारला. शासनाने नाशिक सिडको येथील कार्यालयाचे कामकाज संपले असल्याने येथील तत्कालीन प्रशासक कांचन बोधले यांच्यासह अधिकार्‍यांची नवी मुंबई येथील कार्यालयात बदली केली. नाशिक सिडको कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी दोन ते चार लिपिक ठेवले होते. प्रशासक नसल्याने कामासाठी औरंगाबाद अथवा मुंबई कार्यालयात जावे लागणार असल्याने राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी विरोध करत आंदोलन केले होते. आठवड्यातून दोन दिवस सिडको कार्यालयात थांबून आपण नागरिकांची कामे मार्गी लावणार आहे. नागरिकांची कामे सिडकोच्या नाशिक कार्यालयातच होतील, अशी माहिती कुरे यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडको प्रशासकपदी राजय कुरे नियुक्त appeared first on पुढारी.

Exit mobile version