Site icon

नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार – शासनाचा आदेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी केलेले आंदोलन व विरोधाला यश आले आहे. शासनाने सिडकोच्या नवी मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरु ठेवण्याचे सांगुन इतर अधिकारी कर्मचारी , विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यालय सुरुच राहणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सिडकोचे नाशिक येथील कार्यालय बंद करुन तेथील अधिकारी कर्मचारी यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना देणेबाबत कळविण्यात आले आहे. सिडकोने भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी, लिज होल्ड ते फ्री होल्डसम करण्याची व इतर अनुषंगिक बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने ही बाब विचारात घेता, संदर्भाधीन पत्रामध्ये सुधारणा करुन कामाकरीता आवश्यक असणारा कमीत कमी लिपीक वर्गीय कर्मचारी वर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा. परंतु, अन्य अधिकारी कर्मचारी, विशेषतः तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडको प्रशासन कार्यालय सुरूच राहणार - शासनाचा आदेश appeared first on पुढारी.

Exit mobile version