नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल

सिन्नर बारावी निकाल www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण 4319 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 3821 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शेकडा 88.46 टक्के निकाल लागला. तालुक्यातील 92 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले. तर 780 विद्यार्थी प्रथम क्षेणीत, 2200 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

मुलांच्या निकालाची टक्केवारी 84.52 तर मुलींची टक्केवारी 93.29 टक्के राहिल्याने मुलांच्या तुलनेत 9 टक्के जास्त राहिल्याने मुलीच टक्केवारीत यंदा अव्वल राहिल्या. शताब्दी विज्ञान महाविद्यालय, आगासखिंड (100 टक्के), शासकीय आयटीआय, सिन्नर (100 टक्के) या दोन महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यात 30 कनिष्ठ महाविद्यालयासह शासकीय आयटीआय व दोन ठिकाणी किमान कौशल्य विभागाचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे : सिन्नर महाविद्यालय (80.73 टक्के), ब. ना. सारडा कनिष्ठ महाविद्यालय, सिन्नर (95.58 टक्के), महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय (93.65), न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, बारागावपिंप्री (94.90), न्यू ब्रम्हानंद ज्युनिअर कॉलेज दोडी बुद्रुक (94.73), पी. आर. भोर विद्यालय अ‍ॅण्ड डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, ठाणगाव (67.79), न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, वडांगळी (89.78), नूतन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, वावी (80.68), देवपूर हायस्कूल आणि एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय, देवपूर (94.54), जनता माध्य. उच्च माध्य. विद्यालय, नायगाव (69.86 टक्के), उच्च माध्यमिक विद्यामंदिर, दापूर (94.44), माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालय, दातली (93.18 टक्के), जनता माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, पांढुर्ली (72.41), व्ही. पी. नाईक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नांदूरशिंगोटे (62.85 टक्के), श्री भैरवनाथ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, शहा (84.09), पाथरे हायस्कूल आणि एस. जी. कनिष्ठ महाविद्यालय, (60 टक्के), टी. एस. दिघोळे कनिष्ठ महाविद्यालय, नायगाव (91.96), एस. जी. पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कुंदेवाडी फाटा (94.59), उच्च माध्यमिक आश्रमशाळा चापडगाव (84.61), जनता विद्यालय, डुबेरे (66.66), आ. माणिकराव कोकाटे कनिष्ठ महाविद्यालय, पंचाळे (91.11), कनिष्ठ महाविद्यालय कोनांबे 11 पैकी 09 (81.81), श्री साईनारायण गुरुकूल कनिष्ठ महाविद्यालय, कोनांबे (55.55 टक्के), श्री स्वामी समर्थ विद्यालय, आगासखिंड (70 टक्के), शताब्दी विज्ञान महाविद्यालय, आगासखिंड (100 टक्के),नवजीवन कॉलेज ऑफ सायन्स, सिन्नर (95.78 टक्के), एस. एस. के. आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स, सायन्स कनिष्ठ महाविद्यालय वडझिरे (97.14 टक्के), श्री सिद्धकपालेश्वर महाविद्यालय खंबाळे (98 टक्के), आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालय, पांगरी (87.50 टक्के), सिन्नरभूषण सूर्यभानजी गडाख माध्यमिक विद्यालय (98.66), आकाश पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय (98.27 टक्के), शासकीय आयटीआय, सिन्नर (100 टक्के). तर जीएमडी आर्टस्, बी. डब्ल्यू. कॉमर्स, सायन्स महाविद्यालय सिन्नर -किमान कौशल्य (96 टक्के), महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय किमान कौशल्य (92.64 टक्के).

दोन महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के
शताब्दी विज्ञान महाविद्यालय, आगासखिंड (100 टक्के), शासकीय आयटीआय, सिन्नर (100 टक्के) या दोन महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल appeared first on पुढारी.