नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाने माघारीपूर्वीच गावनिहाय प्रचाराचा नारळ वाढवला आहे. त्यावरून उमदेवार ‘फायनल’ झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीची यंदाची निवडणूकही चुरशीची होईल, असे दिसते. निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (दि.20) माघारीची अंतिम मुदत आहे. तथापि, जवळपास सर्वच उमदेवार निश्चित झाल्यामुळे माजी आमदार वाजे व युवा नेते सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. गावागावांतील ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी संचालक आदींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा ज्वर वाढू लागल्याचे दिसत आहे. बाजार समितीच्या प्रचारात भारत कोकाटे व राजेश गडाख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे.

आ. कोकाटेंची दूध संघात बैठक
आरंभी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा, त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन, जि. प. च्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांचा वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांच्या गर्दीत असलेल्या आमदार कोकाटे गटानेही जवळपास सर्वच उमेदवार निश्चित केल्याचेे समजते. त्यामुळे उमेदवार कामाला लागलेले असले तरी थेट प्रचाराचा धुरळा उडालेला नाही. आमदार कोकाटे यांनीतालुका दूध संघात मंगळवारी (दि.18) बैठक घेऊन निवडणुकीचे नियोजन केल्याचे समजते.

भाजप-मनसेची आघाडी
यंदाच्या या निवडणुकीत भाजपने उमेदवारांची जुळवाजुळव केली आहे. त्यांनी मनसे व मित्र पक्षांशी आघाडी करून तिसर्‍या पॅनलची निर्मिती केल्याने अन्य दोन पॅनलसमोर आव्हान उभे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक appeared first on पुढारी.