नाशिक : ‘सीएट’चा दिवाळीसाठी 65 हजारांचा बोनस

बोनसमध्ये वाढ

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टायर तयार करणार्‍या सीएट कंपनीत दिवाळीचा भरघोस बोनस जाहीर झाला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार कायम कामगारांना 55 ते 65 हजार रुपये दिवाळी बोनस खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे.

टायर उद्योगात उत्पादन व मागणी यात प्रतिकूल परिस्थिती असताना व उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू नसताना कंपनी व्यवस्थापन व सीटूप्रणीत मुंबई श्रमिकसंघ कामगार युनियन यांच्यात सकारात्मक वातावरणात चर्चा होत एक हजार 84 कामगारांना सेवाज्येष्ठतेनुसार 65 हजार रुपये बोनस लाभ देण्यात आला आहे. याचबरोबर मुंबईच्या भांडुप प्लांट व व्हीआरएस घेतलेल्या कामगारांनाही बोनस मिळणार आहे. व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विभागप्रमुख विकास शिर्के, प्रकल्पप्रमुख श्रीनिवास पत्की, नाशिकचे प्रकल्पप्रमुख रोहित साठे, उत्पादनप्रमुख विनय जोशी, उदय कन्सारा तसेच युनियनच्या वतीने अध्यक्ष भिवाजी भावले, सरचिटणीस कैलास धात्रक, उपाध्यक्ष पोपट सावंत, विनय यादव तसेच सदस्य वाल्मीक भडांगे, आद्यशंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला. दिवाळीपूर्वीच बोनस खात्यात जमा झाल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे. उर्वरित नाशिक जिल्ह्यातील कंपन्यांतदेखील बोनस मिळाला असून, काही कंपन्यांच्या चर्चा सुरू असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘सीएट’चा दिवाळीसाठी 65 हजारांचा बोनस appeared first on पुढारी.