नाशिक : सुदृढ बालक अभियानात अडीच हजार बालके आढळली व्याधिग्रस्त

व्याधिग्रस्त बालक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत नाशिक शहरात करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत जवळपास अडीच हजार मुलांना विविध स्वरूपाची व्याधी जडल्याची बाब समोर आली आहे. या अडीच हजारांपैकी १,६४६ मुलांवर औषधोपचार करण्यात आले असून, ८७८ बालकांना पुढील उपचारासाठी त्या-त्या रुग्णालयांत पाठविले जाणार आहे.

शासन आदेशानुसार जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविले जात आहे. यात अंगणवाडीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या बालके व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्याकरिता नाशिकसाठी ९७ हजार बालकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला देण्यात आले आहे. या आरोग्य तपासणीकरिता वैद्यकीय विभागाने ३१३ पथके स्थापन केली आहेत. या पथकांद्वारे २९२ शाळांमध्ये मुलांची आरोग्य तपासणी केली केली जात असून, १९० अंगणवाड्यांमध्येही तपासणी केली जात आहे. इतर ९४ ठिकाणीदेखील तपासणी होत आहे. अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत ९७ हजार ९३ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी अडीच हजार बालकांना विविध स्वरूपाची व्याधी असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सुदृढ बालक अभियानात अडीच हजार बालके आढळली व्याधिग्रस्त appeared first on पुढारी.