नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी

परीक्षा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सीईटी जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षेसाठी निवडण्याकरिता ’सुपर 50’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या प्रवेशपूर्व निवड चाचणीचे शनिवारी 12 नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा 200 गुणांची असून, परीक्षेचा कालावधी सकाळी 11.00 ते 1.00 वाजेपर्यंत असा दोन तासांचा राहील. विद्यार्थ्यांनी स. 10.30 वाजता परीक्षा परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे. परीक्षेचे माध्यम मराठी असेल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी हे विषय समाविष्ट असतील. इ. 10 वी च्या स्तरावरील अभ्यासक्रम असेल. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. उत्तरपत्रिकेसाठी ओएमआर शीटचा वापर केला जाणार आहे.

ही आहेत परिक्षा केंद्रे…

* प्रत्येक तालुक्यात एक शाळा परीक्षा केंद्र राहणार आहे.
* तालुकानिहाय परीक्षा केंद्र तालुकास परीक्षा केंद्र
* नाशिक : शासकीय आश्रमशाळा देवरगाव,
* त्र्यंबकेश्वर : अनुदानित आश्रमशाळा वाघेरा,
* पेठ : शासकीय आश्रमशाळा इनामबारी,
* दिंडोरी : शासकीय आश्रमशाळा पिंपरखेड,
* इगतपुरी : शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा मुंढेगाव,
* निफाड : अनुदानित आश्रमशाळा निफाड,
* कळवण : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चणकापूर,
* सुरगाणा : अनुदानित आश्रमशाळा,
* देवळा : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रामेश्वर,
* सटाणा : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोघेश्वर,
* चांदवड : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पारेगाव,
* नांदगाव : अनुदानित आश्रमशाळा सारताळे,
* मालेगाव : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गरबड,
* सिन्नर : लो. शं. बा. वाजे विद्यालय
* येवला : स्वामी मुक्तानंद विद्यालय

हेही वाचा:

The post नाशिक : सुपर 50 सीईटी-जेईईसाठी 12 नोव्हेंबरला प्रवेशपूर्व निवड चाचणी appeared first on पुढारी.