नाशिक : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन

रेल्वे रिटायरिज सोशल वेल्फेअर असोसिएशन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे रिटायरिज वेल्फेअर असोसिएशन ठाणे नाशिक युनिट आयोजित टाकळी लिंक रोड डीएम सिटी फॅमिली रेस्टॉरंट येथे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन 2023 या वर्षीचा स्नेहमेळावा संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्नेहमेळावा जानेवारी महिन्यात घेण्यात येतो. त्याप्रमाणे नारायणबापूनगर रुद्रा फार्म, डीएम सिटी फॅमिली रेस्टॉरंट येथे ठाणे, भुसावळ, जळगाव, कल्याण, इगतपुरी आदी ठिकाणांहून पदाधिकारी, रेल्वे प्रतिनिधी यांसह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित झाले होते. सर्व पदाधिकारी, अध्यक्ष व प्रतिनिधी यांच्या हस्ते कार्यक्रम प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जानेवारी महिन्यात आलेल्या वाढदिवसाच्या सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्यांनी वयाचे 75 वर्ष आनंददायी आयुष्याची शिडी पार केली. अशा ज्येष्ठांचादेखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये विशेष 92 वर्षीय पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये सुखदेव राऊत, शिवपालसिंह बायस, एच. डी. ठाकरे यांसह 25 जणांचा समावेश होता. सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने बाहेरगावावरून आलेल्या पदाधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून तर कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत येण्याची व जाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रेल्वे रिटायरिज वेल्फेअर असोसिएशन ठाणे हेड क्वॉर्टरचे अध्यक्ष प्रदीप आठवले, सचिव अन्वरअली बापे, अध्यक्ष रमेश राव, खजिनदार प्रकाश कुरबे, नाशिक शाखाचे अध्यक्ष राजेश चावंडे, सचिव नगरदेवळेकर, परदेशी आदी उपस्थित होते. अरूण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन appeared first on पुढारी.