नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

स्टेट बँक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2022-23 वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखेबरोबर तालुकास्तरीय बँक शाखा शुक्रवारी (दि.31) रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षअखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्च करण्यासाठी तसेच जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागाराकडून वितरित होणारे देयके व धनादेश स्टेट बँकेत वटवून रक्कम काढणे व शासनाकडे महसुली उत्पन्नाच्या रकमा भरणा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वर नमूद स्टेट बँक शाखांसह जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली स्टेट बँकेची शाखा, सुरगाणा तालुक्यातील देना बँक व शासकीय व्यवहार हातळणार्‍या अन्य बँक शाखा व कार्यालये 31 मार्च रोजी रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहेत.

The post नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार appeared first on पुढारी.