नाशिक : स्मार्ट सिटी कामांमुळे येत्या 5 मे पर्यंत वाहतूक मार्गांत बदल; वाहतूक कोंडीची शक्यता

स्मार्ट सिटी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू असून, शहरातील नऊ ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गांवर 120 दिवसांसाठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. 5 मेपर्यंत वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले असून, काही मार्गांवर दुतर्फा वाहतुकीस मनाई केली आहे, तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात भूमिगत विद्युतवाहिका, मलवाहिका, पिण्याच्या पाइपलाइनचे कामकाज सुरू झाले आहे. रस्त्यावरील 630 मीटर रोडचे काम पाच ते आठ टप्प्यांत होणार आहे. या रस्त्यांवर सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत वाहतुकीला प्रतिबंध असेल. यासह रस्त्याच्या कामकाजानुसार वाहतुकीत वेळोवेळी बदल होतील, असे वाहतूक पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले आहे. काम सुरू असलेल्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून, रात्रीच्या वेळी वाहनांना दिसेल असे एकेरी मार्ग, प्रवेश बंद, रेडियम बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. यासह हे निर्बंध पोलिस, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनदल व आपत्कालीन सेवेतील वाहनांनादेखील लागू असतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ज्या वाहतूक मार्गात बदल केले आहे तेथे रस्त्याच्या दुतर्फा 120 दिवसांसाठी ‘नो-पार्किंग झोन’ राहणार असून, बॅरिकेडिंगपासून प्रवेश बंद राहील. त्याचप्रमाणे नो पार्किंगचे रेडियम फलक व ब्लिंकर्स राहणार असून, बॅरिकेडिंगजवळ दोन स्मार्ट सिटी वॉर्डन असतील. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिस सतत पाहणी करतील. या मार्गांवर अपघात झाल्यास संबंधित कंपनी जबाबदार राहणार असून, हे नियम 5 मेपर्यंत लागू राहणार आहेत.

हे मार्ग बंद : पर्यायी मार्ग असे…
1. चोपडा लॉन्स ते जुना गंगापूर नाका : मॅरेथॉन चौकाकडून गंगापूर नाक्यावरून चोपडा लॉन्समार्गे पंचवटीकडे जातील. यासह चोपडा लॉन्स ते प्रमोद महाजन गार्डनसमोरून मॅरेथॉन चौकाकडे वाहने जातील.
2. केकाण रुग्णालय ते चोपडा लॉन्स : मॅरेथॉन चौकाकडून गंगापूर नाक्याकडून वाहतूक चोपडा लॉन्समार्गे पंचवटीकडे जाईल. यासह चोपडा लॉन्स ते प्रमोद महाजन गार्डनसमोरून मॅरेथॉन चौकाकडे वाहने जातील.
3. शनि चौक ते सरदार चौक (दुहेरी रस्ता) : शनि चौकातून कार्तिकस्वामी मंदिराकडे, शनि चौकातून गोराराम मंदिराकडे, सरदार चौकातून रामकुंड व गाडगे महाराज पुलाकडे.

हेही वाचा:

The post नाशिक : स्मार्ट सिटी कामांमुळे येत्या 5 मे पर्यंत वाहतूक मार्गांत बदल; वाहतूक कोंडीची शक्यता appeared first on पुढारी.