नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नांदगाव www.pudhari.news

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा धडाका लावत जमिनीचा लिलाव काढण्याचे सुरू केल्याने, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आसल्याने, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नांदगाव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दि. १२ रोजी बैठक घेण्यात आली.

यावेळी, शेतकरी बचाव समन्वयक बापुसाहेब महाले, जिल्हा अध्यक्ष निवृत्ती पगारे, युवा जिल्हाध्यक्ष परशराम शिंदे, तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण भोजराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परशराम शिंदे, निलेश चव्हाण, बापुसाहेब महाले, गारे पाटिल, संतोष गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष विजू पाटिल चव्हाण, सोपान पवार, आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र वाघ, निवृत्ती दादा खालकर, विठ्ठल दादा आहेर, रमेश बागुल, सुदान काळे, शिवाजी जाधव, राकेश चव्हाण, मधुकर बोरसे, वसंत मोरे, सुभाष चव्हाण, अरूण पवार, देविदास देवरे, अक्षय सरोदे, सोमनाथ शिंदे आदि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या आंदोलनासाठी आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना यांनी पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा:

The post नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय appeared first on पुढारी.