नाशिक : स्वामीनारायण मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापनेस प्रारंभ

Swami narayan mandir www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
स्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) येथे मूर्तीप्रतिष्ठापना महोत्सवास प्रारंभ झाला असून, संस्थेचे मुख्य ब्रह्मस्वरूप गुरुहरी महंत स्वामी महाराजांचे आगमन झाले आहे. याप्रसंगी बालमंडळाने नृत्य पुष्पांजली अर्पण करून स्वामीजींचे स्वागत केले. सद्गुुरू संत भक्तिप्रिय स्वामी (कोठारी स्वामी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ब्रह्मस्वरूप गुरुहरी महंत स्वामी महाराजांनी नूतन शिखरबद्ध स्वामीनारायण मंदिर परिसर पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी मंदिराच्या निर्मिती व लोकार्पणावेळी ज्यांनी सेवा केली ते सर्व तन, मन, धनाने सुखी राहतील व जे या मंदिराच्या घुमटाखाली बसून भगवंताचे दर्शन, भजन, भक्ती आराधना करतील ते निश्चित शाश्वत सुखाचा आनंद अनुभवतील, या शब्दात भाव व्यक्त केले. याप्रसंगी ब्रह्मस्वरूप गुरुहरी प्रमुख स्वामी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देताना ते भावविवश झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : स्वामीनारायण मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापनेस प्रारंभ appeared first on पुढारी.