नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत

नाशिक

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार हरी जानु पालवी (वय ५१) यास १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. या कारवाईमुळे चांदवड पोलीस ठाण्यात भीषण सन्नाटा पसरला आहे. तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहिवाटी वरून वाद झाल्याने चांदवड पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या भावा विरुद्ध परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचेकडून २० हजार रुपयांची पोलीस हवालदार हरी पालवी यांनी पंचासमक्ष मागणी केली. त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत विभागाचे पथकाने पोलीस हवालदार पालवी यास रंगेहाथ अटक केली. रात्री उशिरा झालेल्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात चर्चेला उधान आले. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : १० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस अटकेत appeared first on पुढारी.