नाशिक : ५६ वा वार्षिक निरंकारी संत सत्संग औरंगाबादला

सुदिक्षा महाराज www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या ५६ व्या वार्षिक निरंकारी सत्संगाचे आयोजन निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २७, २८ व २९ जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील बिडकीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर येथे होणार आहे.

या सत्संगाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचा प्रारंभ संत निरंकारी मंडळाचे मुख्य अधिकारी मोहन छाब्रा यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यामध्ये दिल्लीहून संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इन्चार्ज जोगिंदर मनचंदा यांच्यासह समागम समितीचे चेअरमन, समन्वयक, अन्य सदस्य तसेच महाराष्ट्रातील विविध झोनचे प्रभारी आणि सेवा दलचे क्षेत्रीय संचालक व अन्य अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद तसेच आजूबाजूच्या परिसरातून आणि मुंबई व महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवा दल महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण सहभागी झाले होते. याप्रसंगी छाब्रा म्हणाले की, संत निरंकारी मिशन हे सत्य, प्रेम, शांती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचे मिशन आहे. मिशनचा हा दिव्य संदेश प्रसारित करून मानवाला मानवाशी जोडण्याचे कार्य या संत समागमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. मानवतेचा संदेश जगाला दिला तोच संदेश आज वर्तमान सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज विश्वभर देत असल्याचे सांगितले. हा संत समागम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक मोठ्या श्रद्धेने आणि तन्मयतेने योगदान देत आहेत. आध्यात्मिकतेच्या कुंभमेळ्याचे अनुपम दृश्य साकार करणारा हा दिव्य संत समागम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तगणांसाठी प्रेरणादायी व आनंददायी ठरेल असा आयोजकांचा विश्वास आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ५६ वा वार्षिक निरंकारी संत सत्संग औरंगाबादला appeared first on पुढारी.