नाशिक : ६१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पश्चिम विभागाने कर वसुलीच्या दृष्टीने एक लाखांवरील थकबाकीदार असलेल्या ६१ मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले असून, संबंधित मालमत्तांचे मुल्यांकन काढून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महसुल वाढीच्या दृष्टीने सर्व विभागीय अधिकारी तसेच विविध कर आकारणी विभागाला थकीत कर वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाने एक लाखांवरील थकबाकीदारांची यादी तयार करून वॉरंट बजावण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी तथा उपायुक्त नितीन नेर यांनी अशा ६१ थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले आहे. संबंधित मालमत्तांचे मुल्यांकन काढण्यासाठी त्यांनी ६१ मालमत्तांचा प्रस्ताव बांधकाम विभागाला सादर केला आहे. मुल्यांकन प्राप्त झाल्यानंतर त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असून, लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित मालमत्तांच्या सातबाऱ्यावर महापालिकेचे नाव लावण्यात येईल. तरी थकबाकीदार मालमत्ताधारकांनी तत्काळ घरपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ६१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट appeared first on पुढारी.