Site icon

नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक व रत्नानिधी चेरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींकरिता आयोजित साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९३ पात्र लाभार्थ्यांना साधन सहाय वस्तूंचे आजपासून शिबिराव्दारे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आयोजित शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देऊन दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या नंदिनी मॅडम, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कविता जुनेजा उपस्थित होत्या. शिबिरामध्ये पायांनी दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी जयपूर फूट (कृत्रिम पाय) पोलियोग्रस्तांसाठी कॅलिपर्स किंवा क्रचेस (कुबडी), कोपऱ्याच्या खाली हात नसलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम हात बसविण्यासाठी नावनोंदणी करण्यात आली. दिव्यांग साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९३ पात्र लाभार्थ्यांना साधन सहाय वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून,  मंगळवारी (दि. २०) सामान्य रुग्णालय कळवण, तर बुधवारी (दि. २१) मालेगाव येथे दि. ११ ते ४ या वेळेत दिव्यांग व्यक्तींकरिता साधन सहाय निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी 87670 47438 भ्रमणध्वनी क्रमांकावरदेखील नावनोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आशिमा मित्तल यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण appeared first on पुढारी.

Exit mobile version