नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी

लालपरी इगतपुरी,www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकावर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरी जवळ घडली आहे. विशेष म्हणजे जवळपास ३५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला या बसच्या चालकाने केली आहे.

इगतपुरी जवळ महामार्गावरून ही बस धावत असतांना अन्य एका वाहनधारकाने या बसला ओव्हरटेक करून बसचालकाला याबाबत सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर ही बस महिंद्रा कंपनीजवळ थांबवण्यात आली. या एसटी बसचा क्रमांक MH 15 BT 4129 असा असून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकावर व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित प्रवाशांनी यावेळी केली.

अकोलेहुन कसाराकडे येतांना अनेक ठिकाणी वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदारणामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. प्रवाशांचे देव बलवत्तर म्हणून सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या नंतर इगतपुरी आगारातून नवीन टायर आणून बसविण्यात आले. नंतर एसटी बस कसाऱ्याकडे सोडण्यात आली.

हेही वाचा :

The post नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी appeared first on पुढारी.