नाशिक : 5 दिवसीय गृहप्रदर्शन शेल्टरची सांगता; 637 कोटींहून अधिक उलाढाल

Shelter www.pudhari.news

नाशिक – पुढारी वृत्तसेवा
कोणत्याही शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे स्थान असून एकाच छताखाली विविध पर्याय देण्याचे काम क्रेडाई निरंतर करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. त्या क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

या 5 दिवसीय प्रदर्शन कालावधीमध्ये जवळपास 50000 नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच 450 फ्लॅट्स आणि 100 प्लॉटस्ची नोंदणी केली. या प्रतिसादामुळे सुमारे नाशिकच्या बाजारात जवळपास 637 कोटींची उलाढाल झाली आहे. या समारोपाप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. देवयानी फरांदे, आयजी (पोलीस) बी जी शेखर, राष्ट्रीय क्रेडाई चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, क्रेडाई महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद खैरनार, शेल्टरचे प्रायोजक ललित रुंग्टा व दिपक चंदे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिकमध्ये आपले घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. नाशिक मध्ये तुलनात्मकदृष्ट्या दर कमी असून मनुष्यबळ प्रशिक्षणामध्येहि क्रेडाई ने महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपल्या मनोगतात आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, नाशिकची स्कायलाईन बदलत असून बहुमजली इमारतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. रेरा कायदा आणि युनिफाईड डिसीपीआर मुळे बांधकाम बांधकाम क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, यावेळेस शेल्टरमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्व स्टॉलचे बुकिंग देखील सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाले होते. प्रदर्शनामध्ये सहभागी विकसकांनी भविष्यातील नाशिक कसे असेल याची झलकच दाखविली. शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील यांनी सांगितले की, क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर प्रदर्शननाने अनेक नवे उच्चांक प्रस्थापित केले असून नाशिक ब्रॅण्डिंगकरिता क्रेडाई ने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे असे यामुळे म्हणता येईल. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख घटना जितुभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल, तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत होते. आ. रोहित पवार यांची प्रदर्शनास भेट ः आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमातून वेळात वेळ काढून कर्जत जामखेड चे आ. रोहितदादा पवार यांनी प्रदर्शनास भेट दिली.

लकी ड्रॉ द्वारे निवडलेले चौथ्या दिवसातील भाग्यवंत असे…
1) केतन त्रिवेदी, 2) संदीप येवला, 3) शरद, 4) महेश सोनवणे, 5) असिफ शेख याप्रसंगी डॉ उमेश काळे, डॉ प्रशांत खैरे तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : 5 दिवसीय गृहप्रदर्शन शेल्टरची सांगता; 637 कोटींहून अधिक उलाढाल appeared first on पुढारी.