पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी

संरक्षक भिंत कोसळली

पंचवटी(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : पंचवटीतील पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये मनपाने झोपडपट्टी काढली होती. येथे नागरिकांना राहण्यासाठी १९९२ साली बांधण्यात आलेल्या जीर्ण इमारतीच्या गॅलरीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये रणवीर सरजू मश्राम (वय ५ वर्ष) हा लहान मुलगा जखमी झाला आहे. त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शंकर हिरे, किरण सोनवणे, मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी संजय घोलप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा 

The post पंचवटीतील मनपाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; मुलगा जखमी appeared first on पुढारी.