पालकमंत्री गुलाबराव पाटील : …तर खडसेंना घाबरण्याची गरज नाही

शिवसेना नेते गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय आमचा नाही तर तपास यंत्रणेचा आहे. जर एकनाथ खडसे यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.

भोसरी भूखंड प्रकरणात पुन्हा चौकशी केली जात असून सरकारकडून छळ केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर जळगावचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. भोसरी भूखंड प्रकरण फार जुने प्रकरण आहे. यात एकनाथ खडसे यांचे जावई सुद्धा आतमध्ये आहेत. आता हे प्रकरण सरकारने बाहेर काढले नाही, तपास यंत्रणांनी ते बाहेर काढले आहे. त्यांना पुन्हा यात तपास करायचा असल्याने ते चौकशी करत आहेत, असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे आणि जर ते यात निर्दोष असतील तर त्यांना घाबरण्याची गरज नाही, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

उध्दव ठाकरेंवर टीका….
शिंदे गटातील काही नाराज आमदार फुटून ते भारतीय जनता पक्षात जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकात देण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हे वर्तमानपत्र सर्वश्रृत असून राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्यांचे हे वक्तव्य असेल असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.

हेही वाचा:

The post पालकमंत्री गुलाबराव पाटील : ...तर खडसेंना घाबरण्याची गरज नाही appeared first on पुढारी.