पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी

गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे राष्ट्रवादी देखील संपण्यातच जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्‍हा दूध संघ निवडणूकीत खडसे यांचा पराभव करत भाजप-शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालानंतर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील बोलत होते. दूध संघाचा निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये अपेक्षेनुसार चुरस जुंपली. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार खडसे यांच्यावर टीका करत ते राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच पक्षाने त्यांना दिलेली एमएलसी (member of legislative council) परत घेण्याचा सल्लाही दिला.

खडसेंचा पलटवार…
सहकार विभागातील ही निवडणूक असल्याने राष्ट्रवादीने पहिल्यांदाच आपल्या बळावर ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद पाहायला मिळाली. ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के ग्रामपंचायत राष्ट्रवादीने विजयी केले असून शिवसेनेला तिथे कुठेही यश मिळाले नसल्याचा पलटवार एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.

हेही वाचा:

The post पालकमंत्री गुलाबराव पाटील : एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी संपवली, एमएलसी परत घ्यावी appeared first on पुढारी.