पिंपळनेरमध्ये जागतिक चिमणी दिनानिमित्त कार्यशाळा

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र, पर्यावरणशास्त्र व आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिनानिमित्त कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य के. डी कदम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जी. टी. पी महाविद्यालय, नंदुरबार येथील प्रा. डॉ. डी. एस. पाटील हे उपस्थित होते.

प्रा. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चिमणी सारख्या छोट्याशा पक्षाची दिवसेंदिवस घटत जाणारी संख्या ही चिंतनीय बाब आहे. सध्यस्थितीत ही 80 टक्के संख्या पृथ्वीवरून लुप्त झाली आहे. ही चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तिचे संवर्धन होण्यासाठी सर्व पक्षी प्रेमींनी / निसर्गप्रेमींनी पुढे आले पाहिजे. असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य के. डी. कदम म्हणाले की, निसर्ग वाचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी या कामात आपला सहभाग नोंदवावा. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. बी. सी. मोरे यांनी केले.

योगशिक्षक प्रा. डॉ. वाय. एम. नांद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आयक्युएसीचे कॉर्डिनेटर प्रा. डॉ. संजय खोडके यांनी आभार मानले. चिमणीदिनानिमित्त प्रा. डॉ. बी. सी. मोरे यांच्या संकल्पनेनुसार चिमण्यांसाठी घरटी बनविण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये विद्यार्थ्यांनी चिमणी पक्षीसाठी निवारा म्हणून सुंदर घरटे तयार केले.  याप्रसंगी प्रो. डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ, प्रा. डॉ. पी. पी. तलवारे, प्रा. सी. एन. घरटे, प्रा. के. आर. राऊत, प्रा. एस. एन. तोरवणे, प्रा. डॉ. एन. बी. सोनवणे, प्रा. पूजा सूर्यवंशी व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेरमध्ये जागतिक चिमणी दिनानिमित्त कार्यशाळा appeared first on पुढारी.