Site icon

पिंपळनेरला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर येथे सकल जैन समाजातर्फे जैन समाजाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शोभायात्रेत जैन समाजातील सर्व महिला पुरुष, लहान मुले-मुली मोठ्या उत्स्फूर्त सहभागी झाले. सटाणा रोडवरील महावीर भवनपासून शोभा यात्रेला आज मंगळवार, दि. 4 सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली.

पिंपळनेर : भगवान महावीर जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला सजीव देखावा.

शोभायात्रा महावीर भवनपासून गोपाळनगर, नानाचौक, बाजारपेठ, खोल गल्ली, बसस्टॅंडमागील परिसरात भगवान “महावीर की जय हो” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर साडेअकरा वाजता ही शोभायात्रा महावीरभवनजवळ आल्यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. युवकांनी व महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, गीतिका व भगवान महावीर यांच्या जीवनपटातील काही प्रसंग सजीव देखावा सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष करून नवयुवक मंडळाचे अध्यक्ष दिनेश गोगड, कपिल टाटिया, शालाबाह्य गोगड, स्वाती गोगड, वैजयंती गोगड, अर्चना गोगड, सोनाली गोगड, वैशाली गोगड, मोना गोगड, रेखा गोगड, करिश्मा जैन, सपना गोगड, अनिता गोगड, जयश्री गोगड आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्रिशालामाता व राजे सिद्धार्थ यांचा सजीव देखावा शैलाबाई गोगड व जयश्री गोगड यांनी सादर केला. चिमुरड्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुरेख सादर केला. महिला भगिनी व लहान लहान बालकांनी सहभाग घेतला. शोभायात्रेत धनराज जैन, राजमल गोगड, सुभाष गोगड, रिखबचंद टाटिया, मोहन गोगड, कुंदनमल गोगड, प्रदीप संघवी, दगडूशेठ रांका, स्वरूपचंद गोगड, रिखब गोगड, राकेश रावळमल जैन, रमण चोरडिया, पुखराज टाटीया, अशोक कोचर, सुभाष रांका, डॉ. चोरडीया, कांतीलाल बाफना, नितीन बुरड व सर्व महिला उपस्थित होते.

पिंपळनेर : शाेभायात्रेत सहभागी झालेले बांधव. (सर्व छायाचित्रे – अंबादास बेनुस्कर) 

हेही वाचा:

The post पिंपळनेरला भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा appeared first on पुढारी.

Exit mobile version