Site icon

पिंपळनेर : एकादशीनिमित्त हरिनामाच्या जयघोषात किन्नर आखाडयाचाही सहभाग

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

साक्री येथील खाजगी वाहन चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील आषाढी एकादशीनिमित्त भक्तगणांना साबुदाण्याची खिचडी व केळी असा फराळ वाटपाचा महाप्रसाद देण्यात आला. या महाप्रसादाचा हजारो भक्तगणांनी आस्वाद घेत हरिनामाच्या जयघोषात उपास पर्वणीचा आनंद घेतला. या अध्यात्मिक कार्यक्रमास सुरत, धुळे व पिंपळनेर येथील किन्नर आखाड्याचे प्रमुख गुरु महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी महामंडलेश्वर व रूपाली पार्वती जोगी यांच्यासह त्यांचे सहकारी पायल कुवर, आकाशी कुवर, अर्चना कुवर, आशा कुवर, सीता कुवर यांनी देखील या कार्यक्रमात विशेष सहभाग घेऊन भक्तगणांना फराळ वाटप केला. कुठल्याही प्रकारे कोणाकडूनही जाहीर वर्गणी न घेता सर्व वाहन चालक-मालक बंधूनी हा सामाजि उपक्रम राबविला. यावेळी शहरात विशेष बंदोबस्तासाठी असलेले सर्व पोलीस बंधू-भगिनींनी सुद्धा फराळ करून उपवास पर्वणीचा लाभ घेतला.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : एकादशीनिमित्त हरिनामाच्या जयघोषात किन्नर आखाडयाचाही सहभाग appeared first on पुढारी.

Exit mobile version