पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर गुटखा www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

गुजरात राज्यातील सुरत येथून साक्री धुळे मार्गे मालेगाव शहरात होणारी प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी धुळे एलसीबीने उघड केली. या कारवाईत ट्रकसह १२ लाख १८ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंत पाटील यांना सुरतहून मालेगावकडे प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाला दहिवेल गावात सदर संशयित ट्रक दिसताच ट्रकचालकाला थांबवून चौकशी करण्यात आली. त्याने शेख अस्लम शेख उस्मान (४३, रा.न्यु आझादनगर,ग.नं.५,मालेगाव) असे नाव सांगितले. त्यास ट्रकसह साक्री पोलीस ठाण्याच्या आवारात आणले असता (ट्रक क्रमांक एम.एच.४१ जी ७१६५) ची पंचासमक्ष तपासणी केली. या तपासणीत सदर ट्रकमध्ये ९८ हजार ४०० रूपये किमतीचा विमल पानमसाला व तंबाखू १ लाख १५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल प्लास्टीक कचरा व कपड्याचे गठ्ठे आढळून आले. या मुद्देमालासह ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व १० लाख रूपये किमतीचा ट्रक असा एकूण १२ लाख १८ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून साक्री शहर पोलीस ठाण्यात शेख अस्लम शेख उस्मान सह त्याचा साथीदार सुफीयान यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, सतिष पवार, पंकज खैरमोडे, सपकाळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास आर. व्ही. निकम करत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.