पिंपळनेर : जिल्हाधिकाऱ्यांनी केले ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द

जिल्हाधिकारी जलज शर्मा www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश सुभाष बधान यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

योगेश बधान यांची आई (मयत) व वडील सुभाष शिवराम बधान यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. येथील शासकीय जमिनीवर दुकान असून ते बधान यांच्या आई-वडिलांचे आहे. तसेच योगेश बधान हे एकत्रित कुटुंबाचे घटक असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र अतिक्रमण केलेले नसून, विभक्त राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो असा बचाव योगेश बधान यांनी केला होता. मात्र हा बचाव ग्राह्य धरण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी योगेश बधान यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : जिल्हाधिकाऱ्यांनी केले ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द appeared first on पुढारी.