पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी

मॅरेथॉन www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील आदित्य फाउंडेशन व सुहरी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आज बुधवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ. जितेश चौरे व आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. योगिता चौरे यांनी केले आहे स्पर्धा तीन वयोगटातून घेण्यात येणार असून अठरा वर्षाच्या पुढील स्पर्धकास टाइमिंग रन दहा किलोमीटर धावणे 14 वर्षांपुढील स्पर्धकांसाठी ड्रीम रन पाच किलोमीटर धावणे व तीन किलोमीटर फॅमिली रन असणार आहे. गेल्या काही वर्षापासून आदित्य फाउंडेशन पिंपळनेर व सुहरी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जितेश चौरे व डॉ.योगिता चौरे यांच्या संकल्पनेतून पिंपळनेर मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचे निकष ठेवण्यात आले आहेत यात अठरा वर्षांपुढील स्पर्धकासाठी टाइमिंग रन दहा किलोमीटर,14 वर्षाच्या पुढील स्पर्धकांसाठी 15 किलोमीटर ड्रीम रन मॅरेथॉन व फॅमिली रन साठी तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे निकष ठेवण्यात आलेले आहेत. अयोग्य किंवा कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय आजारामुळे त्रस्त असेल तर अशा स्पर्धकांना सहभाग होण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांना पिंपळनेर मॅरेथॉन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी टी-शर्ट पदकासह ई सर्टिफिकेट आणि रिफ्रेशमेंट मिळेल, अशी माहिती डॉ. जितेश चौरे यांनी दिली. सर्व सहभागींनी योग्य त्या मापाचा टी-शर्ट फॉर्ममध्ये नमूद करावा तसेच टी-शर्ट व इतर माहितीसाठी स्पर्धेचे समन्वयक आशिष ठाकरे पंकज मोरे गणेश चव्हाण व दीपक भोये यांच्याकडे शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे किंवा पिंपळनेर नवापूर रस्त्यावरील सुहरी रुग्णालय येथे स्पर्धकांनी संपर्क करावा.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी appeared first on पुढारी.