पिंपळनेर : प्रमुख रहदारीच्या मार्गावर भरणारा बाजारामुळे होतोय मनस्ताप

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर येथे प्रमुख रहदारी असलेल्या पिंपळनेर सटाणा मार्ग येथे भरणारा शुक्रवारी आठवडे बाजारामुळे गावक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील बाजार मुख्य बाजारपेठेत स्थलांतरित करावा. अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांकडून सरपंच देविदास सोनवणे, सदस्य प्रमोद गांगुर्डे, योगेश बधान यांना देण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून मुख्य बाजार पेठेत भरणारा बाजार हा गावात येणाऱ्या प्रमुख मार्गावर भरत असल्याने आठवडे बाजाराच्या दिवशीच गावात काही गंभीर घटना घडत आहेत. तसेच मयत, आजारपण असा प्रसंग उद्भवल्यास गावातील नागरिकांना बाजरपेठेतील गर्दीचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या भागातील पंचमुखी कॉर्नर ते सुभाष चौक व साईबाबा मंदिर ते वर्धमान पतसंस्था या गावात जाणाऱ्या प्रमुख रहदारीच्या मार्गावर बेशिस्तपणे पथारी व हातगाडी व्यावसायिक दुकाने लावून बसलेले असतात. गावातील नागरिकांना  यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत त्वरीत दखल घेऊन प्रमुख रत्यांवर बसणारा बाजार स्थलांतर करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. त्यावर सकारात्मक चर्चा करून ग्रामपंचायत प्रशासनाने आठवडे बाजार पुढील आठवड्यापासून मुख्य बाजारपेठेत स्थलांतरित करण्यात येईल असे नागरिकांना आश्वासन दिले आहे. यावेळी मा. सभापती संजय ठाकरे, पं. स. सदस्य देवेंद्र गांगुर्डे, शाम पगारे, रिखब शेठ जैन, विजय लोखंडे, संजय भामरे, स्वामी खरोटे, धमेंद्र लोखंडे, अनुशेट सिंधी, दिनेश जैन, विजय लोखंडे, मनोज खैरनार, धर्मेंद्र लोखंडे, योगेश कोठावदे, मनोज चित्ते, विजय दशपुते, बाळा ओझरकर, संदेश कोठावदे आदींसह गावातील नागरिक व व्यापारी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : प्रमुख रहदारीच्या मार्गावर भरणारा बाजारामुळे होतोय मनस्ताप appeared first on पुढारी.