Site icon

पिंपळनेर : बनावट कागदपत्रांद्वारे बळकावली शेतजमीन

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील आमोदे येथील वृद्धाची नातेवाइकांनीच बनावट कागदपत्रांद्वारे छावडी शिवारातील शेतजमीन बळकावून फसवणूक केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमोदे येथील रतन बळीराम चांभार यांची छावडी शिवारातील शेती गट क्र. १०६ ही पाच हेक्टर ६३ आर ही वडिलोपार्जित मालकीची शेतजमीन आहे. ५ जून १९९६ ते २०१२ पर्यंत मंजुळा वना चांभार यांनी विलास वामन चांभार, किशोर वना महाले, सजन वना महाले, प्रकाश वना महाले, कलाबाई शांतीलाल चांभार यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन नावावर करून घेतली. यासंदर्भात रतन चांभार यांनी वेळोवेळी नातेवाइकांच्या माध्यमातून तसेच समाजातील ज्येष्ठांच्या माध्यमातून बैठक घेऊन शेतजमीन पुन्हा नावावर करून देण्यासाठी विनंती अर्ज केले. मात्र, त्याला न जुमानता रतन चांभार यांनाच उलटपक्षी ‘तुझ्याकडून जे होईल ते करून घे असे म्हणत गावात राहणे कठीण करू’ असे धमकविण्यात आले. याबाबत रतन चांभार यांच्या तक्रारीवरून मंजुळा चांभार यांच्यासह सहा जणांवर पोलिसांत फिर्याद दिली असून, ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वसावे हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : बनावट कागदपत्रांद्वारे बळकावली शेतजमीन appeared first on पुढारी.

Exit mobile version