पिंपळनेर : लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन धुळे यांचा ३४ वा वर्धापन दिन फाउंडेशनच्या कार्यक्षेत्र पिंपळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साक्री येथील प्रसिध्द डॉ. जयवंत अहिरराव, डॉ. विजया अहिरराव, स्त्री रोगतत्ज्ञ रोशनी पगारे, पंचायत समिती सदस्य सुनीता सोनवणे, लुपिन फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक  अनिल गुप्ता, निलेश पवार, जिल्हा व्यवस्थापक सुनील सैंदाणे, प्रकल्प व्यवस्थापक चंदन टोकशा,  कुशावर्त पाटील, दीपक जाधव, संदीप तोरवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. निलेश पवार यांनी प्रास्ताविक केले. तसेच फाउंडेशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला. त्यानंतर अनिल गुप्ता यांनी फाउंडेशनच्या देशभरातील चाललेल्या ग्राम विकासाच्या कार्याविषयी माहिती दिली. वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. लुपिन फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रात कुटुंब विकासात शाश्वत उपजीविकेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अकरा लाभार्थींना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉक्टर जयवंत अहिरराव यांनी हृदयरोग व काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. विजया अहिरराव यांनी संस्थेने केलेल्या कामाची कौतुक केले. महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी, पोषण आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सुनील सैंदाणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमाकांत पाटील, उमाकांत साळुंखे, मनोज एखादे, निलेश देसाई, राकेश खैरनार, दिनेश घरटे व समुहाने परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा appeared first on पुढारी.