Site icon

पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
स्काऊट गाईड कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी ५७ चुलींची मांडणी करून स्वत:च्या हाताने स्वयंपाक करीत सुग्रास जेवणाचे कौतुक करत संस्कारांचे दर्शन घडविले. याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आईने दिलेले संस्कार जीवनात रुजवावे, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी केले.

कै. एन. एस. पी. पाटील विद्यालयाचा यंदाचा स्काऊट गाईडकॅम्प चिकसे येथील श्रीक्षेत्र गांगेश्वर मंदिर परिसरात राबविण्यात आला. कॅम्पसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सचिन साळुंके होते. पोलीस उपनिरीक्षक अय्याज शेख, संस्थेचे सचिव महेंद्र गांगुर्डे, मुख्याध्यापक संजय भदाणे, पंकज वाघ, मुख्याध्यापक एस.एस.शहा, उपमुख्याध्यापक उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक एस. एस. शहा यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट शिक्षक उदय एखंडे, बी. एल. चव्हाण व टी. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॅम्पसाठी विशाल गांगुर्डे, प्रवीण पाटील, राजश्री अकलाडे, स्नेहल पगारे, जयश्री ठाकरे, पी. एच. साळुंके, डी.जी.नहिरे, एस. एस.जाधव, एस.एच.चौरे, महेश गांगुर्डे, रमेश काळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : स्काउट गाईड कॅम्पमध्ये पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक appeared first on पुढारी.

Exit mobile version