बीडचा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा नाशिकमध्ये निर्धार

पंकजा मुंडे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्हयातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे बुधवारी (दि.५) होणाऱ्या दसरा मेळाव्यास नाशिकमधून जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन क्रांतीवीर वंसतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले आहे. वंचिताच्या न्याय हक्कासाठी असलेल्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीवीर वंसतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले.

दसरा मेळाव्याच्या अनुषगांने नाशिक मर्चंट बँकेच्या सभागृहात पूर्वतयारीची बैठक झाली. या बैठकीत मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दसरा मेळावा हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून मेळाव्याचे मुख्य प्रयोजन समाजातील उपेक्षित, शोषित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी एक महत्वाचे व्यासपीठ आहे. ऊसतोड कामगारांसह बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम या मेळाव्यातून केले जाते. त्यामुळेच हा केवळ मेळावा नसून एक सामाजिक चळवळ आहे. संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे हा मेळावा होत असतो. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांनी तिर्थक्षेत्री सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी अखंडीतपणे सुरु ठेवली आहे. सर्वपक्षीय नेते या मेळाव्यास मार्गदर्शन करत असतात, असे धात्रक यांनी सांगितले. दरवर्षी या मेळाव्यास जिल्हयातून समाजबांधव मोठ्या संख्येने जातात आणि विचारांची लयलूट करतात. यंदाही मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते उदय सांगळे यांनी केले.

बैठकीला पंढरीनाथ थोरे, अ‍ॅड. पी. आर. गिते, बाळासाहेब वाघ, प्रकाश घुगे, मनीषा बोडके यांनी केले. बैठकीस बाळासाहेब गामणे, भास्कर सोनवणे, डॉ. धर्माजी बोडके, महेंद्र आव्हाड, सचिन दराडे, विशाल पालवे, सुदाम ढाकणे, शरद बोडके, गोविंद घुगे, साहेबराव आव्हाड, वाल्मिक सांगळे, दामोधर मानकर, नारायण काकड, प्रल्हाद काकड, पुष्पा आव्हाड, वसंत विंचू, हेमंत नाईक, माणिक सोनवणे, संपत वाघ, बाळासाहेब चकोर, विनायक शेळे, जगनपाटील भाबड आदींसह समाजबांधव उपस्थित होते. 

हेही वाचा :

The post बीडचा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा नाशिकमध्ये निर्धार appeared first on पुढारी.