महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे

अद्वय हिरे,www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळीही दिल्ली मोठी होती. परंतु, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला. आज पुन्हा मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय. शिवसेनेला कोंडीत पकडले जात असताना ठाकरेंच्या वारसदारासाठी धजावला नसतो, तर कर्मवीरांनी मला माफ केले नसते, म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राला पुन्हा उभारी देण्यासाठी ही लढाई असून, सत्ता उपभोग घेण्यासाठी नव्हे. लहानपणापासूनच सत्ता पाहत आलोय, म्हणून मला सत्तेची हवा लागणार नाही, महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची गरज आहे, महाराष्ट्रात शेटजी, भटजीचे सरकार नको, असा टोला उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी लगावला.

सहकार ते जलसंपदा विभागात केलेल्या कामांची यादी वाचत त्यांनी, आज शहरात जी १०० कोटींची कामे होत आहेत, ती उद्धव ठाकरे यांची देण आहे. रावळगावला एमआयडीसी उभी राहत असली तरी तिथे उद्योग येणार नाहीत, कारण इथे टक्केवारीचे राजकारण चालते, असा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

हिंदुत्वाच्या गप्पा करत फुटलेल्यांनी मालेगावात २०१७ च्या महापालिका निवडणुकीतच हिंदुत्व सोडले होते. काँग्रेस-एमआयएमबरोबर युती करताना हिंदुत्व आठवले नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु, त्यांना पहिले पासूनच शपथ मोडण्याची सवय आहे. मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन धर्मवीर आनंद दिघे यांची शपथ घेतल्यानंतरही निवडणूक सहकार मोडीत काढून टक्केवारीचे राजकारण आणले. वर्गणीच्या नावावर लूट सुरू आहे, बेरोजगार तरुणांना भरकटवले जात आहे. हे सर्व चित्र बदलण्यासाठी साथ द्या, संकल्प करुया उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा अशी साद डॉ. हिरे यांनी यावेळी घातली.

१७८ कोटीचा आकडा कागदोपत्रीच

१७८ कोटीचा आकडा कागदोपत्रीच गिसाकाविषयी १७८ कोटींचा जो आकडा चर्चेत आलाय तो २०१७ मध्ये दाखल केलेल्या याचिकेदाखल प्राप्त कागदपत्रांतूनच पुढे आलाय. गिरणा अॅग्रोची कागदपत्र तरी आहेत, पण गिरणा बचाव समितीच्या पावत्याही नाहीत. तेव्हा हा एकूणच आकडा वाढू शकतो, असा दावा डॉ. हिरे यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

The post महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.