महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग

महारोजगार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा कौशल्य विकास रोजगार अंतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटी व आ. देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.7) सपट महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 3 हजार 600 बेरोजगार युवक व युवतींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 582 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, विजय गवंडी, अनिसा तडवी, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. आर. पी. देशपांडे, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. पी. सी. कुलकर्णी, एम. के. पाटील तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे उपसंचालक इंद्रभान काकड आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून रोजगाराच्या संधी वाढत असून, आपण केवळ उद्योजक व बेरोजगार युवक यांच्या दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात अधिकाधिक रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. फरांदे यांनी दिले. तर युवक युवतींनी आपण करत असलेले काम निष्ठेने केल्यास त्यात निश्चित यश प्राप्त होते, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.

या कंपन्यांचा सहभाग….
बॉश लिमिटेड, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन, एमएसएल ड्राइव्ह लाइन सिस्टिम्स, जनरल मिल्स इंडिया, जेव्हीएस कॉमॅट्स्को इंडस्ट्रिज, पॉझिटिव्ह मीटरिंग पंम्स, महिंद्रा अँड महिंद्रा, रेसेमोसा एनर्जी इंडिया, फ्लायव्हील रिंगगेअर, एमएसएस इंडिया, अपोलो होम हेल्थकेअर, लाइफ केअर हॉस्पिटल, व्हीआयपी इंडस्ट्रिज, नोबेल हायजिन, मेमको, अथर्व मोल्ड्स, इंडिया ग्लास, सोहम हॉस्पिटल, डाटा मॅटिक्स, डब्ल्यूएनएस, परम स्किल्स इंडिया.

हेही वाचा:

The post महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग appeared first on पुढारी.