Site icon

मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या 9 महापालिकांच्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 5 ऑगस्ट रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मंगळवारी आदेश दिले आहेत. यापूर्वी आयोगाने 14 महापालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता.

अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी 5 ऑगस्ट रोजी सोडत काढली जाईल. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 6 ते 12 ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

The post मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत appeared first on पुढारी.

Exit mobile version