मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर चोरट्याचे समर्पण

दादा भुसे

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खेळण्यातील बंदुकीच्या धाकावर ओळखीच्या घरात घसून लुटमारी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न अखेर फसला. बनावट बंदुकीच्या आधारे घरातील महिलांना घाबरवणाऱ्या चोराचा डाव त्याच्याच अंगलट आला. घरतल्या महिलांनी चोरट्यास केलेल्या विरोधाने उडालेल्या गोंधळात चोरट्याने चोरीचा नाद सोडून बचावासाठी आणि लपण्यासाठी त्याच घरातल्या टेरेसचा आधार घेतला. दटावून, धमकावूनही खाली येण्यास नकार देणार्‍या चोरट्याला पालकंमत्री दादा भुसे यांनी दुसर्‍या बंगल्याच्या टेरेसवरुन अभयदानाचा शब्द दिल्याने अखेर चोरट्याने दरवाजा उघडला आणि पोलिसांना शरण आला. याठिकाणी त्याला चांगलाच ‘फराळ’ देण्यात आला. सोमवारी (दि.24) दुपारी शहरातील जैन स्थानक परिसरात महावीर अ‍ॅटोमोबाईलचे संचालक विनित दोषी यांच्या घरात हे थरारनाट्य घडले. हे नाट्य घडले.

शहरातील महावीर ॲटोमोबाईलचे संचालक विनित दोषी यांच्या परिचयातील फिटर पवार नामक व्यक्ती दुपारी त्यांच्या घरी गेला. तेव्हा भावना व हेमांगी दोषी या घरात होत्या. त्याने पप्पाने पाठविले अशी बतावणी केल्याने त्यांनी त्यास घरात प्रवेश दिला. मात्र, क्षणात त्याने खिशातून पिस्तूल काढून त्याच्या धाकावर चोरीचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकाराने घाबलेल्या महिलांनी त्याला विरोध केला असता त्याने एकीचा चावा घेतला. तसेच घरातील कात्रीने भावना यांना मारले. परंतु, एकूणच या अनपेक्षि प्रकाराने घरात उडालेल्या गोंधळाने चोरटा चांगलाच बिथरलेला. त्याने घरातील दोघी महिलांनी केलेला प्रतिकार पाहून चोरीचा नाद सोडून स्वत:ला वाचविण्यासाठी आणि बचावासाठी त्याच घराचा टेरेसचा आधार घेत तो टेरेसवर पळाला आणि त्याने टेरेसचा दरवाजा बंद करत टेरेसवर दबा धरुन बसला.

घरातील या सर्व गोंधळाने एव्हाना घराजवळ शेजाऱ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. त्यामुळे चोरट्याचे पळण्याचे सर्वच मार्ग बंद झाले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य करीत तिघा महिलांना सुरक्षित केले. परंतु, चोरटा टेरेसवरुन खाली येण्यास तयार नव्हता. तो पर्यंत या घटनेची वार्ता शहरात पसरली व या घटनेची माहिती पालकमंत्री दादा भूसे यांच्या पर्यंत पोहचली. या घटनेची माहिती समजताच मंत्री दादा भूसे घटनास्थळी दाखल झाले. स्वत: मंत्री दादा भूसे हे शेजारील घराच्या टेरेसवर जाऊन त्यांनी चोरट्याशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री दादा भूसे यांनी चोरट्याशी संवाद साधत, ‘कुणी काही करणार नाही, बाहेर ये, शिवाय तुझ्याजवळ दुसरा काही पर्यायही नाही’, अशी वस्तुस्थिती चोरट्याला सांगितल्यावर अखेर चोरटा वरमला. मंत्री भुसे यांनी स्वत: दोशी यांच्या टेरेसवर जावून चोरट्याला बाहेर आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मात्र संतप्त लोकांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. यावेळी त्याची झडती घेतली गेली. मात्र, काहीच मिळून आले नाही. मंत्री महोदयांनी देखील या चोरट्याच्या कानशिलात लगावत पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. चोरट्याला छावणी पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

अधिक वाचा :

The post मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर चोरट्याचे समर्पण appeared first on पुढारी.