मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सशस्त्र दरोडा

सशस्त्र दरोडा,www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृतसेवा; मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या MH 04GM 8051 क्रमांकाच्या वाहनावर कोयता आणि चोपरने हल्ला करून मोबाईल व सोने असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.

या खाजगी वाहनातून दिवा येथील पाच नागरिक प्रवास करत होते. वाहनातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पळ काढत आपला जीव वाचवला. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घोटी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून या संदर्भात तीन संशयितांविरद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

The post मुंबई आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात सशस्त्र दरोडा appeared first on पुढारी.