मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

मुख्यमंत्री www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

गोदाकाठी तपोवन परिसरात केवडीवन येथे स्वामी नारायण मंदीर साकारण्यात आले आहे. स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी नाशिकच्या  दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वामी नारायण मंदीरात हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची देखील उपस्थिती होती.

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकारी नाही. केंद्रातील आणि राज्यातील गृहखाते सकारात्मक कामे करत असून राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात हयगय केली जाणार नाही. देशाविरोधात घोषणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. एनआयए, ईडी यांनी राज्य पोलिसांच्या साहाय्याने राज्यासह दहापेक्षा अधिक राज्यात पीएफआयविरोधात कारवाई करत  छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये तीनशे पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या या सलग छापेमारीच्या कारवाईनंतर पीएफआयवर मोठी कारवाई करण्यात येवून पीएफआयवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पीएफआयशी संबंधित इतर ९ संघटनांवरही केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे.

हेही वाचा:

The post मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.