मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर सुरु असलेल्या आदिवासी मोहोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.15) गोंधळ उडाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही जणांनी फलक फडकवीत आदिवासी संशोधकाना पीएचडी अन् शिष्यवृत्ती मिळावी अशी मागणी केली. पोलीसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले. त्याचवेळी ना. शिंदे यांनी एका आंदोलकाल व्यासपीठावर घेऊन या, त्यांचे म्हणणे आपण ऐकू असे सांगत वादावर पडदा टाकला. मात्र अचानक झालेल्या या गोंधळाने पोलीस यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

हेही वाचा:

The post मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात आंदोलन appeared first on पुढारी.